महावितरण कंपनीने आणले जामखेडकरांच्या नाकीनऊ ! शहरात वीजपुरवठा खंडित होण्याचे सत्र सुरुच

जामखेड (प्रतिनिधी) – सध्या शहरात खंडीत विजपुरवठ्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे विजेवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना चांगलात आर्थिक फटका बसत आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरात विजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. भारनियमन नसले तरी, यामुळे शासकीय कार्यालयातील कामकाजासह विजेवर अवलंबून असणारे व्यावसायिक प्रभावित होत आहेत.
उकाड्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने महिवातरण विरोधात नागरिकांचा रोष वाढत चालला आहे. याबाबत आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे व नुतन खासदार निलेश लंके यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे
जामखेड शहरासह तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून महावितरण विभागाने जामखेडकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे कोणत्या ना कोणत्या कारणाने विज खंडित करण्यात येत आहे त्याचच सध्या पावसाळ्याच्या तोंडावर मेंटेनन्स च्या नावाखाली रविवार व सोमवार रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे.
हे असतानासुद्धा रात्री उपरात्री कधीही वीज पुरवठा खंडित करण्यात येतो याबाबत महावितरण अधिकार्यांशी संपर्क केल्यास ते फोन उचत नाही अशी बिकट अवस्था झाली आहे गेल्या चार दिवसांपासून कधी एक तास, कधी दोन तर कधी चार तास असा वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शहरात एकप्रकारे अघोषित भारनियमन सुरु असल्याचा हा प्रकार आहे.
वारंवार होणाऱ्या वीज वितरण खंडित मुळे नागरिक व्यावसायिक, हाॅस्पिटल, शासकीय कार्यालये यासह वैद्यकीय क्षेत्रातही क्ष-किरण, सोनोग्राफी, दंतवैद्यक यांची सेवा प्रभावित होत आहे. ग्रामीण भागातून शहरात उपचारासाठी तसेच विविध प्रशासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांचा यामुळे वेळ वाया जातो. त्यात प्रिंटिंग प्रेस, झेरॉक्स, सुतारकाम, पिठाच्या गिरण्या, वेल्डिंग असे व्यावसायिकदेखील यामुळे त्रस्त झाले आहेत.
पाण्याचे रोटेशन बिघडते वारंवार खंडीत होणाऱ्या विजेमुळे सर्वाधिक फटका पाणीपुरवठा विभागाला बसत आहे. ग्रामीणसह शहरातही वीज पुरवठा खंडित होत असेल तर महावितरणचे नियोजन योग्य प्रकारे नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये महावितरण विरोधात रोष निर्माण होत चालला आहे.
महावितरण कर्मचारी अहोरात्र काम करतात पण त्यांच्या कामाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम अधिकारीच नाहीत. त्यांचे कोणतेही नियंत्रण नाही. सदर अधिकारी जामखेड येथे हजर नसतात आणि ते कोणाचेही फोन उचलत नाहीत. या गंभीर व अत्यावश्यक विषयावर राजकीय सामाजिक पुढाऱ्यांचे दूर्लक्ष होताना दिसुन येत आहे. विजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणणे योग्य नियोजन करावे अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.
दुरुस्तीच्या कामासाठी घ्यावे लागते ट्रिपिंग
पावसाळा असल्याने विजपुरवठ्याशी निगडीत अनेक कामे सुरू असतात. झाडांच्या फांद्या छाटणे, कार्बन काढणे, तांत्रिक दुरुस्तीमुळे ट्रिपिंग घ्यावी लागते. तरीही जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याच्या प्रयत्न करू.
– शरद चेचर , उपकार्यकारी अभियंता, महावितरण जामखे





