मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी आहे.यामुळे प्रचाराला मोठा वेग आला आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यादरम्यान जयंत पाटलांनी अजित पवारांबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
सध्या महायुतीच्या नेत्यांकडून ‘एक है तो सेफ है’ ‘बटेंगे तो कटेंगेच्या’ मुद्द्यावर जोर देण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मात्र बटेंगे तो कटेंगे हे वक्तव्य बरोबर नसल्याचं म्हटलं आहे.
याला काही अर्थ नाही. त्यांनी त्या आघाडीतून बाहेर पडले तर त्याला अर्थ आहे, त्यांच्या सोबत रहायचे आणि त्यांच्या एका विधानाला विरोध करायचा हे ठीक नाही, असं जयंत पाटील यांनी म्हंटले आहे. अहमदपूर मतदार संघातील उमेदवार विनायकराव पाटील यांच्यासाठी जयंत पाटील यांनी सभा घेतली, त्या दरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.