Swimming Championships | पलक धामीला जलतरणात रजत
Updated On:

फातोर्डा – बेंगळुरू येथे चालू असलेल्या ग्लेनमार्क सब-ज्युनियर व ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या पलक धामीने रजतपदक जिंकले.
महाराष्ट्राच्याच पलक जोशीने ब्रॉंझपदक पटकावले. या स्पर्धेत गोव्याच्या संजना प्रभुगावकरने सुवर्णपदक पटकावले. ही स्पर्धा कर्नाटक जलतरण संघटनेने भारतीय जलतरण महासंघाच्या सहकार्याने आयोजित केली होती.





