Weather Update : राज्यात हुडहुडी वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून देण्यात आला इशारा

मुंबई : राज्यात आता थंडीचा जोर वाढू लागला आहे. बांगलच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होणार आहे. रात्रीच्या सुमारास जास्त थंडी पडत असल्याने अनेक जिल्हे गारठल्याचे पाहायला मिळत आहे. कमाल तापमानात 1 ते 2 अंशांनी घट झालीये. त्यामुळे डिसेंबर महिन्यात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
Today's Maharashtra Weather summary from 0830 to 1730 IST@Hosalikar_KS pic.twitter.com/RbXlEDHKEP
— Climate Research & Services, IMD Pune (@ClimateImd) November 26, 2024
‘या’ जिल्ह्यांना दिला इशारा
मागच्या काही दिवसांत तापमानात झालेली घट पाहता IMD कडून पुणे, जळगाव, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली, जळगाव, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. तर दिवसभर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.





