Maharashtra Weather । राज्यात थंडीचा जोर सध्या ओसरताना दिसून येत आहे. त्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा सक्रीय पट्टा तयार झाला असून अरबी समुद्रात आर्दता वाढली आहे. परिणामी राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. त्यासोबतच जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26-28 डिसेंबरदरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपीटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान वाढलं आहे. कडाक्याची थंडी कमी झाली असून येत्या काही दिवसात किमान तापमानात 2-4 अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षाची सांगता वादळी पावसाने होणार असल्याचे हवामान खात्याने वर्तवला आहे. तापमानाचा पारा वाढणार Maharashtra Weather । राज्यात तापमानाचा पारा येत्या दोन दिवसांनी हळुहळु वाढणार असून 2-4 अंशांनी किमान तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम भारतात येत्या 24 तासांत तापमान वाढीला सुरुवात होणार आहे. राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला जोरदार पावसाची शक्यता असून पावसाची तीव्रता मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात राहणार असल्याचं हवामान विभागानं वर्तवलंय.दरम्यान, हवामान विभागानं काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टही दिलाय. बंगालच्या उपसागरात काही दिवसांपूर्वी धडकलेल्या फेंगल चक्रीवादळामुळं बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. यामुळे राज्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. समुद्राचं तापमान कमी जास्त झाल्यानं तसेच चक्राकार वारे आणि तयार होणारा कमी दाबाचा पट्टा इशान्येकडे सरकला आहे. दुसरीकडे उत्तरेकडील थंड प्रवाहाचा झोत राज्याच्या दिशेने असल्याने थंडी वाढली होती पण कमी दाबाचा पट्टा धडकल्याने अरबी समुद्रात आर्दता निर्माण झाली आहे.याचाच परिणाम म्हणून राज्यात पावसाला पोषक स्थिती तयार झाली आहे. कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट? Maharashtra Weather । 26 डिसेंबर- धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर 27 डिसेंबर- नाशिक, पुणे, नगर,जळगाव,धुळे, नंदूरबार,छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी,बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम हेही वाचा Manu Bhaker Khel Ratna controversy | खेलरत्न पुरस्कारांच्या यादीत मनू भाकरचे नाव नाही, क्रीडा मंत्रालयाने दिले ‘हे’ स्पष्टीकरण….