Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांबाबत केलं मोठं वक्तव्य; म्हणाले….

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यादरम्यान अनेक राजकीय घटना घडताना दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांबाबत एक मोठं वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एका जाहीर सभेमध्ये आठ आमदार आणि दोन मंत्री जे काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्ष सोडून गेले होते ते संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्याचा दर ठरलाय त्यांना मला पुन्हा पदरात घेयचं नाहीये. मला माझ्या पक्षामध्ये अशी लोकं नको आहेत. विकली जाणारी आणि विकली गेलेली लोकं मला परत घेयची नाहीत.
आता माझ्या शिवसेनेला नवीन उभारी आलेली आहे. पक्षात अनेक तरुण उभे राहिले आहेत. अनेक ठिकाणी बाळासाहेबांच्या वेळीची लोकं यांच्यामुळे कंटाळून गेलेली ती आता परत आली आहेत. त्यामुळे माझी शिवसेना आता जोमात आहे आणि ती लोकं कोमात आहेत. असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मशाल चिन्हाबाबत काय म्हणाले?
मशाल हे चिन्ह आम्ही पूर्वीदेखील घेतलं होतं. ज्यावेळी छगन भुजबळ आमच्यासोबत होते त्यावेळी देखील आम्ही मशाल चिन्ह घेतलं होतं. त्यामुळे मशाल हे चिन्ह आमच्यासाठी चांगलं आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.





