MCC Murugappa Gold Cup Hockey 2024 : महाराष्ट्राची विजयी सलामी…

MCC Murugappa Gold Cup Hockey 2024 :- महाराष्ट्र संघाने गतविजेत्या बीपीसीएल संघाला पराभूत करताना अखिल भारतीय एमसीसी-मुरुगप्पा करंडक हॉकी स्पर्धेत विजयी सलामी दिली. स्पर्धेच्या 95 वर्षांच्या इतिहासात महाराष्ट्राने प्रथमच या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता.
महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियम, एग्मोर येथे झालेल्या लढतीत महाराष्ट्राने बीपीसीएल संघावर 5-4 अशी मात केली. बीपीसीएलच्या तेजस चव्हाणने 11 व्या तर राजिंदर सिंगने 15 व्या मिनिटाला गोल करताना बीपीसीएल संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली होती.
महाराष्ट्राच्य मयूर धनावडेने 22 व्या मिनिटाला गोल करताना महाराष्ट्राचे खाते उघडले. त्यानंतर सुनील सोमवरपेटने 40 व्या मिनिटाला गोल करताना बीपीसीएलची आघाडी 3-1 अशी वाढविली.
Chess Olympiad 2024 (9th Round) : महिला संघाने अमेरिकेशी व पुरुषांनी उझबेकिस्तानशी साधली बरोबरी…
यानंतर मात्र महाराष्ट्राच्या आदित्य लालगे आणि स्टीफन स्वामी यांनी प्रत्येकी 2 गोल महाराष्ट्राची आघाडी थेट 5-3 अशी केली. स्टीफन स्वामीने 45 व्या व 46 व्या मिनिटाला महाराष्ट्रासाठी गोल केले. त्यानंतर बीपीसीएलने वरून कुमारने पेनल्टी स्ट्रोकचे रूपांतर गोलमध्ये करून महाराष्ट्राची आघाडी 5-4 अशी कमी केली. शेवटच्या चार मिनिटांमध्ये बीपीसीएलला बरोबरी करण्याची संधी होती. मात्र वरुणचा जबरदस्त स्ट्रोक गोलरक्षक शिवरत्न रसाळने अचूकपणे अडवून महाराष्ट्राला विजय मिळवून दिला.

