Maharashtra Accident : भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला; 10 सेकंदात 3 वर्षांच्या चिमुकल्यासह 6 जणांचा अंत
Maharashtra Accident : महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण रस्ते अपघातांनी राज्य हादरले आहे.

Maharashtra Accident : गोंदिया जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला आहे. भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या SUV कारला जोरदार धडक दिल्याने तीन वर्षांच्या चिमुकल्यासह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी झालेले सर्वजण मजूर असून ते मध्य प्रदेशातील बालाघाट येथून तेलंगणातील करीमनगर येथे कामासाठी जात होते. (Maharashtra Accident)
भरधाव ट्रकची SUV ला जोरदार धडक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरा गावाजवळ झाला. समोरून येणाऱ्या SUV ला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की SUV चा अक्षरशः चुराडा झाला. (Maharashtra Accident)
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. मात्र, या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. सात जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra Accident)
मृतांमध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये किरण संतोष वैद्य (26), संतोष मात्रे (38), सुशीला मात्रे (35), रूपसेन तेजलाल सत्याकर (35), ज्योती रूपसेन सत्याकर (32) आणि तीन वर्षीय आरुष मात्रे यांचा समावेश आहे. (Maharashtra Accident)
मृत आणि जखमी सर्वजण मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किरनापूर तहसील येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. कामानिमित्त तेलंगणातील करीमनगरकडे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. (Maharashtra Accident)
दरम्यान, या प्रकरणी ट्रक चालक मोहसिन खान (32) याच्याविरोधात निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. (Maharashtra Accident)
छत्रपती संभाजीनगरमध्ये 21 वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातही मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली. टाऊन हॉल उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताचा थरारक CCTV व्हिडिओही समोर आला आहे. (Maharashtra Accident)
![]()
मिळालेल्या माहितीनुसार, मित्राच्या काकूच्या अंत्यविधीवरून दुचाकीने परतत असताना तरुणाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. या दुर्घटनेत मोहम्मद झिशान मोहम्मद अली (वय 21, रा. खोकडपुरा, पैठण गेट) याचा मृत्यू झाला. कुटुंबातील एकुलता एक मुलगा गमावल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Accident)
Accident : पुणे-बंगळुरु महामार्गावरील उडतरे येथे भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही.





