Maharashtra Reservation: राज ठाकरे म्हणतात, ‘महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही…’

Raj Thckeray : राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. त्यातच सर्व पक्ष योग्य उमेदवाराच्या शोधात असल्याचे दिसत आहे. मात्र या स्पर्धेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आघाडी घेतलीय. कारण मनसेकडून विधानसभेसाठी दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आलीय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी राज ठाकरे यांनी मनसेचे विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार जाहीर केले. यावेळी पत्रकारांशी सवांद साधताना राज ठाकरेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं आहे.
मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात ऐरणीवर आला आहे. या आरक्षणाच्या प्रश्नावरही राज ठाकरे यांनी मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्राममध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, “मुंबई, ठाणे किंवा इतर शहरांमध्ये जसा विकास झालाय. जसे उड्डाणपूल झालेत. या गोष्टी का होतात? मूळच्या लोकांसाठी या गोष्टी होत नाहीत. तर बाहेरून अतिरिक्त येणाऱ्या लोकांसाठी हे केलं जात आहे. आपल्या राज्यातील सर्वाधिक पैसा हा बाहेरून आलेल्या लोकांवर खर्चा होतोय.
ठाणे हा देशातील एकमेव असा जिव्हा आहे, जिथे एका जिल्ह्यात सात ते आठ महानगर पालिका आहेत. जर ठाण्यात इतक्या महापालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातील लोकांनी वाढवली? बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा इतका मोठा आहे की त्यांची व्यवस्था करण्यातच सरकारचा पैसा जातो आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. पण तरूणांना माहितीच नसतात, असं राज ठाकरेंनी म्हटलं.





