Maharashtra Religious Freedom Bill – महाराष्ट्रामध्ये सध्या प्रस्तावित धर्मस्वातंत्र्य कायदा मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत आहे. ज्याची लव जिहादचा कायदा म्हणून (Maharashtra Religious Freedom Bill) देखील जोरदार चर्चा आहे. काही जण त्याला अँटी कन्वहर्जन कायदा म्हणतात तर काही जण धर्मस्वातंत्र्य कायदा म्हणतात. पण हा मुद्दा फक्त धर्मापुरता मर्यादित नाहीये तर तो थेट राजकारण, समाजकारण, संविधान आणि वैयक्तिक स्वातंत्र्याशी निगडित जोडलेला आहे. सरकारचं म्हणणं असं आहे की दबाव, फसवणूक, प्रलोभन किंवा जबरदस्तीने होणारं धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा आवश्यक आहे. तर दुसऱ्या बाजूला विरोधकांचं म्हणणं असं आहे की अशा प्रकारच्या कायद्यामुळे आपल्या समाजामध्ये व्यक्तीच्या धार्मिक निवडीवरती अप्रत्यक्ष बंधन येऊ शकतं शिवाय यामुळे तापलं जाणार राजकारण तर महत्त्वाचा भाग आहे म्हणूनच पुढचे काही दिवस तरी लव जिहादचा हा कायदा महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी असणार आहे. (Maharashtra Religious Freedom Bill) सरकारच म्हणणं आहे की दबाव फसवणूक प्रलोभन किंवा जबरदस्तीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा आवश्यक आहे. तर विरोधकांच म्हणणं आहे की अशा प्रकारच्या कायद्यामुळे व्यक्तीच्या धार्मिक निवडीवरती अप्रत्यक्ष रित्या बंधन येऊ शकतं. म्हणजे साध्या सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या कायद्याच्या घोषणेचा मूळ उद्देश हा धर्मांतर पूर्णपणे थांबवणं नाही तर बेकायदेशीर किंवा जबरदस्तीने होणार धर्मांतर रोखणं आहे. Maharashtra Religious Freedom Bill या कायद्याला समर्थन देणाऱ्यांच म्हणणं असं आहे की अनेक ठिकाणी आर्थिक मदत विवाह, शिक्षण, सामाजिक दबाव किंवा खोटी आश्वासन देऊन धर्मांतर हे घडवून आणल्याच्या तक्रारी समोर येतात. त्यामुळे यासाठी स्पष्ट कायदेशीर चौकट असणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या कायद्यामध्ये सामान्यतः धर्म बदलण्यापूर्वी प्रशासनाला माहिती देणं जबरदस्ती किंवा फसवणुकीद्वारे धर्मांतर केल्यास शिक्षा करणं त्याचबरोबर ती महिला अल्पवयीन किंवा अनुसूचित जाती जमातीच्या बाबतीत अधिक कठोर तरतुदी ठेवणं अशा गोष्टींचा समावेश असायला हवा. Maharashtra Religious Freedom Bill महाराष्ट्रातील प्रस्तावित विधेयकातही काही अशा स्वरूपाचे मुद्दे अपेक्षित आहेत. जबरदस्ती फसवणूक किंवा प्रलोभनाद्वारे धर्मांतराला बंदी धर्मांतरापूर्वी प्रशासनाला माहिती देण्याची प्रक्रिया आणि त्याचबरोबर दोषी आढळल्यास दंड आणि कारावास आणि विवाहाच्या माध्यमातून होणाऱ्या धर्मांतराची चौकशी अशा तरतुदी या चर्चेत आहेत. हे सगळं संरक्षणात्मक वाटत असलं तरीदेखील यामध्ये अनेक बाजू आहेत. कारण प्रश्न असा आहे की जबरदस्ती ठरवणार कोण? प्रलोभनाची व्याख्या काय असणार? आणि व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय आणि बाह्य प्रभाव यामधील सीमारेषा नेमकी कुठ कुठे आखायची? या कायद्याचे समर्थक सांगतात की यामुळे दुर्बल घटकांना दबावाखाली धर्म बदलण्यापासून संरक्षण मिळेल. धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करायचं असेल तर जबरदस्तीने किंवा त्याचबरोबर ती फसवणुकीने होणारे धर्मांतर रोखायलाच हवं असा त्यांचा युक्तिवाद असतो. याशिवाय देशातील अनेक इतर राज्यांमध्ये देखील अशा प्रकारचे कायदे हे आधीच अस्तित्वात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही स्पष्ट कायदेशीर चौकट असावी असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या दृष्टीने हा कायदा म्हणजे धर्मबंदी नाही तर धार्मिक स्वातंत्र्याच संरक्षण आहे. तर दुसरीकडे या कायद्यावरती टीका करणाऱ्यांच म्हणणं पूर्णपणे वेगळं आहे. त्यांच्यामध्ये अशा कायद्याचा वापर हा अनेकदा खऱ्या गुन्हेगारांपेक्षा वैयक्तिक निवड करणाऱ्या लोकांवरती जास्त होतो. विशेषतः यामध्ये आंतरजातीय विवाह, प्रेमसंबंध किंवा स्वतःच्या श्रद्धेनुसार घेतलेला धर्माबद्दलचा निर्णय यांच्याकडे संशयाने पाहिलं जाऊ शकतं. प्रशासनाला आधी माहिती देण्याची जी तरतूद आहे ही देखील अनेकांच्या मते वैयक्तिक स्वातंत्र्यावरती अतिक्रमण करणारी ठरू शकते कारण धर्म हा अत्यंत खाजगी आणि अंतर्मनाशी संबंधित विषय असताना देखील राज्याने त्यामध्ये कितपत हस्तक्षेप करावा हा मूलभूत प्रश्न निर्माण होतो. या निमित्ताने संविधानाच्या दृष्टीने पाहिलं तर हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. भारतीय संविधानाच्या कलम 25 नुसार प्रत्येक नागरिकाला धर्म मांडण्याचा आचरण करण्याचा आणि प्रसार करण्याचा अधिकार आहे. मात्र हा पूर्णपणे अधिकार हा अमर्याद नाही तर सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि त्याचबरोबर आरोग्य यासाठी राज्याला काही मर्यादित नियमन करण्याचा अधिकार आहे. Maharashtra Religious Freedom Bill, म्हणूनच या कायद्याचे समर्थक म्हणतात की हा कायदा संविधानाच्या चौकटीत बसतो पण विरोधकांचं म्हणणं असं आहे की नियमन आणि नियंत्रण यामधील रेषा अतिशय पुसट असते आणि अशा कायद्यामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरती अप्रत्यक्ष रित्या दबाव तयार होऊ शकतो. आता या कायद्यामागची राजकीय बाजू पाहुयात.. राजकीय दृष्ट्या हा विषय कमी महत्त्वाचा नाही सत्ताधारी पक्ष या कायद्याला जबरदस्ती विरोधी आणि संरक्षणात्मक पाऊल म्हणून मांडत आहे तर दुसरीकडे विरोधक हे त्याकडे सामाजिक ध्रुवीकरण धार्मिक संशय आणि त्याचबरोबरती संविधानिक अधिकारांवरती बंधन या दृष्टिकोनातून पाहत आहेत. आपल्या महाराष्ट्रासारख्या विविधतेने भरलेल्या राज्यात हा मुद्दा लगेचच धार्मिक आणि सामाजिक आणि त्याचबरोबर निवडणूक राजकारणाशी जोडला जातो. त्यामुळे हा कायदा जो आहे तो फक्त आणि फक्त विधानसभेतला मुद्दा राहणारा नाही तर तो समाजातील अनेक स्तरांवरती चर्चेचा आणि संघर्षाचा विषय ठरू शकतो याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याशिवाय यावरून होणार राजकारण हे महाराष्ट्राच समाजमन ढवळून काढणार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये धर्मांतर विरोधी कायदे हे आधीपासूनच अस्तित्वात आहेत. पण प्रत्येक राज्याची सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी ही वेगळी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असा कायदा तयार करताना इतर राज्यातील मॉडेल हे जसंच्या तसं लागू करणं सध्या तरी योग्य ठरणार नाही. आपल्या महाराष्ट्राची सामाजिक दृष्ट्या जी रचना आहे पुरोगामी परंपरा, बहुसांस्कृतिक स्वरूप आणि त्याचबरोबर संविधानिक मूल्यांची जाणीव लक्षात घेऊन अधिक संतुलित आणि स्पष्ट कायदेशीर चौकट असणं आवश्यक असणार आहे. शेवटी पाहिलं तर धर्मस्वातंत्र्य कायदा हा केवळ धर्माचा मुद्दा नाहीतर तो वैयक्तिक स्वातंत्र्य,सामाजिक संतुलन,कायदेशीर स्पष्टता आणि संविधानिक मर्यादा यांचा संगम असणार आहे. एकीकडे जबरदस्तीने किंवा फसवणुकीने होणार धर्मांतर रोखण्याची गरज नाकारता येत नाही. पण दुसरीकडे व्यक्तीच्या श्रद्धेचा निर्णय हा तिचा मूलभूत अधिकार आहे हे पण तेवढंच खरं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असा कायदा (Maharashtra Religious Freedom Bill) करायचा असेल तर तो भावना आणि राजकारणाच्या आधारे नव्हे तर स्पष्ट व्याख्या, संतुलित तरतुदी आणि संविधानिक जबाबदारी या तीनही गोष्टी लक्षात घेऊन करावा लागणार आहे. कारण शेवटी प्रश्न हा कायदा असावा की नसावा एवढाच नाही तर तो कायदा किती न्यायस्पष्ट आणि किती संतुलित असणार हे महत्वाचे असणार आहे.