काळजी घ्या ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी

Maharashtra rain । सध्या राज्यात काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्यातील तुरळक भागात पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसात राज्यात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी Maharashtra rain ।
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील कोकणातील रायगड जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता Maharashtra rain ।
तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागातील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.





