Pune Lok Sabha Result 2024 : पुण्यात भाजपच्या मुरलीधर मोहोळांनी मारली बाजी, काँग्रेसचे धंगेकर पराभूत..

Pune Lok Sabha Result 2024 : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. याचदरम्यान महाराष्ट्रातील पुणे येथून मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील लक्षवेधी असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल हाती आला आहे.
पुण्यात तीन प्रमुख उमेदवार जरी रिंगणात होते, पण खरी लढत ही रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्येच होती. याठिकाणी पुणेकरांनी मोदींच्या नेतृत्वाला पसंती दिली आहे.
Sangli Lok Sabha 2024 Result : सांगलीत भाजपसह मविआला मोठा धक्का, अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचा विजय…
पुणे लोकसभेत भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव केला आहे. याठिकाणी वंचितकडून वसंत मोरे हे तिसरे उमेदवार म्हणून लोकसभेच्या रिंगणात होते.
पुणे 2019 सालचा निकाल –
गिरीश बापट (भाजप) – 6,32,835
मोहन जोशी (काँग्रेस) – 3,08,207
अनिल जाधव(वंचित) – 64,793

