Maharashtra Politics : बियाणींचा मर्डर कोणी केला? जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंना इशारा

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिकच्या सभेत बोलताना जोरदार हल्लाबोल केला होता. जातीपातीचे राजकारण कोण करत आहे, असा प्रश्न उपस्थित करत नाव न घेता त्यांनी शरद पवारांवर टीका केली, तर जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली, असा आरोपही त्यांनी केला आहे.
यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केला आहे. डॉ. बियाणी यांचा मर्डर कोणी केला? खऱ्या बापाचा पोरगा असेल तर उत्तर देईल, असे म्हणत आव्हाड यांनी हल्लाबोल केला आहे. आव्हाड म्हणाले, धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलायचे झाले तर मी खूप काही बोलू शकतो, त्यांना फक्त माझा एकच प्रश्न विचारा,
बियाणींचा मर्डर कोणी केला? त्याच्यामागचे कारण काय होते. हिम्मत असेल आणि खऱ्या बापाचा पोरगा असेल तर ते याचे उत्तर देतील. नाही तर आमच्या एक भगिनी आहेत करुणा मुंडे नावाच्या, त्यांना बाजूला मी घेऊन बसतो आणि त्यांना सांगायला लावतो. जो खुद शीशो के घरो मे रहते हे, वो दुसरो के घरो पर पत्थर नही मारा करते, असे म्हणत आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे.





