Maharashtra Politics : भाजपचा मास्टरस्ट्रोक! ‘या’ मोठ्या नेत्याचे घर फोडत पक्षाला पाडली खिंडार

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या दोन अडीच महिन्यांत भाजपमध्ये (Maharashtra Politics) अनेक पक्ष प्रवेश झाले. राज्यात सरकार आल्यानंतर सत्तेचा (Maharashtra Politics) फायदा घेऊन भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झाले. यादरम्यान भाजपने अनेक मोठे नेते गळाला लावले. एखादा नेते फुटत नसला तर भाजपने त्या बड्या नेत्याचा चुलता, त्याचा भाऊ यांनाच पक्षात घेण्याचे सत्र सुरु केले आहे.
जयंत पाटलांना मोठा धक्का
शतप्रतिशत भाजप म्हणणाऱ्या भाजपने आता शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या घरातच पाऊल ठेवत शेकापला खिंडार पाडले आहे.जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील आणि भाचे आस्वाद पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
हे पण वाचा : “राज ठाकरेंचा पक्ष दिल्लीच्या ऑक्सिजनशिवाय जगू शकत नाही”
कोण आहेत पंडित पाटील?
पंडित पाटील हे शेकापचे माजी आमदार रायगड जिल्हा बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांचे धाकटे बंधू आहेत. अलिबाग विधानसभा मतदारसंघातून 2014 साली त्यांनी शेकापकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. अलिबाग विधानसभेवर त्यांनी शेकापचा झेंडा फडकवला होता. रायगड जिल्ह्यामध्ये शेकापचा मोठा दबदबा आहे. प्रत्येक निवडणुकीत शेकापची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरते
भाजपने कोणत्या नेत्यांना दिला पक्षात प्रवेश?
मागच्या दोन दिवसात कागलचे माजी आमदार संजय घाडगे, शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, काँग्रेस नेते प्रसाद हिरे, फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, माजी नगरसेविका मधुबाला भोसले, दिलीप सिंह भोसले यांनी भाजपमध्ये (Maharashtra Politics) प्रवेश केला आहे. सध्या भाजपमध्ये होणारे इनकमिंग बघून विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.





