Maharashtra Politics : मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या ‘या’ खासदाराला मोठा झटका
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics) एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसल्याचे वृत्त असून, पक्षातील 9 पैकी 6 खासदार फुटल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics) एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसल्याचे वृत्त असून, पक्षातील 9 पैकी 6 खासदार फुटल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या सर्वोसर्वा ममता बॅनर्जी यांच्या पक्षात नुकतीच झालेली 20 खासदारांची मोठी फूट आणि त्यानंतर त्यांचे दुसऱ्या पक्षात झालेले विलीनीकरण, या राष्ट्रीय पातळीवरील घडामोडी ताज्या असतानाच आता महाराष्ट्रातही (Maharashtra Politics) तसाच राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बैठकीतील अनुपस्थितीने संशयाला दिले खतपाणी
पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे यांनी सावध भूमिका घेत रविवारी तातडीने आपल्या सर्व खासदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला ९ पैकी केवळ ४ खासदारच प्रत्यक्ष हजर होते. उर्वरित ५ खासदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) उपस्थित असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला होता.
तथापि, याच अनुपस्थितीमुळे राज्यात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले. ठाकरे गटाचे काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या आणि “सर्व खासदार आमच्यासोबतच आहेत,” असा दावा केला होता.
मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी 6 खासदार फुटल्याची आणि ते स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
हिंगोलीच्या खासदारांचे नाव चर्चेत; पण पुत्राचे बंड!
या कथित बंडखोर खासदारांमध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव प्रामुख्याने समोर येत असून, त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याचे बोलले जात आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाला आता एक वेगळे वळण मिळाले आहे.
खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर यांनी यावर आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी घेतलेली भूमिका खुद्द खासदारांसाठीच मोठा धक्का मानली जात आहे. विशेष म्हणजे कृष्णा पाटील आष्टीकर हे आगामी नांदेड विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत.
“मी पळून जाणारा गडी नाही…” : कृष्णा पाटील आष्टीकर
वडिलांच्या कथित बंडखोरीच्या चर्चांवर अत्यंत आक्रमक भूमिका घेत कृष्णा पाटील आष्टीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आपली निष्ठा जाहीर केली आहे. ते म्हणाले “मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, आघाडीचा होतो आणि आघाडीचाच (Maharashtra Politics) राहणार आहे. केवळ कुठली तरी बातमी आली म्हणून माझ्यावर शंका उपस्थित केली जात आहे. पण मी उद्धव साहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. हा पळून जाणारा गडी नसून मैदान मारणारा गडी आहे!”
पुढे बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आणि सांगितले की, “समोरच्यांना आमचे आव्हान पेलावत नसल्यामुळेच असा संभ्रम पसरवला जात आहे. जनतेने आणि कार्यकर्त्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये.” असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.
एकीकडे 6 खासदार फुटल्याच्या बातम्यांमुळे ठाकरे गटात चिंतेचे वातावरण असताना, दुसरीकडे बंडखोर नेत्याच्याच घरातून पुत्राने उद्धव ठाकरेंसाठी दिलेली ही साथ सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. आता खासदार नागेश पाटील आष्टीकर स्वतः यावर काय भूमिका (Maharashtra Politics) घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






