Maharashtra Politics : ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांदरम्यान काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर? म्हणाले…
Maharashtra Politics :

Maharashtra Politics : एकीकडे ‘ऑपरेशन टायगर’ची राज्यभरात सुरू झाली असतानाच नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडणार आहे.
काँग्रेसचे माजी आमदार असलेले माधवराव पाटील जवळगावकर आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना वेग आला असून त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
एका जाहीर सभेत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माधवराव पाटील जवळगावकर यांनी काँग्रेसमध्ये राहिल्याबद्दल खंत व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये गेलो असतो, तर आज आमदार राहिलो असतो.
PMPML Vacancies: पीएमपीएमएलचा कारभार रामभरोसे? तब्बल ६० टक्के पदे रिक्त; चालक-वाहकांचा मोठा तुटवडा
मात्र त्या वेळी काँग्रेसचा विद्यमान आमदार असल्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला नाही. त्यांच्या या विधानाने काँग्रेससह राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला आहे.
विशेष म्हणजे, पुढील राजकीय वाटचालीचा अंतिम निर्णय त्यांनी थेट कार्यकर्त्यांवर सोपवला आहे. यासाठी 26 जून रोजी हदगाव येथे महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीतच त्यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी माधवराव पाटील जवळगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असा आग्रह धरला. यावेळी जवळगावकर यांनी, “माझ्या भविष्याचा निर्णय २६ जून रोजी होणाऱ्या बैठकीतील कार्यकर्त्यांच्या भावनांवर अवलंबून असेल,” असे सांगितले. याद्वारे आता पुढील काही दिवसांत मोठी राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, नांदेडच्या राजकारणात नागेश पाटील आष्टीकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांमुळे वातावरण तापले आहे. असे असतानाच आता माधवराव पाटील जवळगावकर संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा:






