Mahashivaratri 2022: तरूणाने समुद्र किनारी साकारले “महादेवांचे वाळूशिल्प’, पाहा दोन टन वाळून साकारलेल्या शिल्पाचे मनमोहक फोटो

मुंबई – भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. देशभरात आज महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यावर्षीची महाशिवरात्री अनेकार्थाने विशेष आहे. गेली दोन वर्ष करोनामुळे भाविकांना उत्सव सजरा करता आला नाही. यंदा संसर्ग कमी झाल्याने मोठ्या उत्साहाने महाशिवरात्री साजरी होत आहे.

महाशिवरात्रीचे औचित्य साधून सिंधुदुर्गातील चित्रकार रविराज चिपकर यांनी वेंगुर्लेतील आरवली सागरेश्वर समुद्र किनाऱ्यावर वाळूच्या सहाय्याने वाळूशिल्प साकारले आहे. दीड ते दोन टनाच्या वाळूच्या सहाय्याने शंकराचे मोहक रूप समुद्र किनाऱ्यावर साकारले आहे. हे वाळूशिल्प साकारण्यासाठी त्याला दोन तासांचा अवधी लागला.

रविराज चिपकर हे नेहमीच सामाजिक विषयांवर वाळूशिल्प साकारत असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे वाळूशिल्पकार म्हणून नावलौकिक आहे. महाशिवरात्री निमित्ताने आरवली सागरेश्वर समुद्र किनाऱ्यावर वाळूशिल्प साकारून अनोख्या पद्धतीने सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.






