Monsoon Update : बळीराजासाठी मोठी बातमी..! मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर; ‘या’ तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार
Monsoon Update : महाराष्ट्राच्या वेशीवर विलंबाने रेंगाळलेल्या मान्सूनमुळे संपूर्ण राज्यात चिंतेचे ढग दाटले असतानाच आता हवामान विभागाकडून अत्यंत दिलासादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Monsoon Update : महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर विलंबाने रेंगाळलेल्या मान्सूनमुळे देशातील सरासरी पर्जन्यमानात ४१ टक्क्यांची मोठी घट झाली आहे. अरबी समुद्रातील कमकुवत वारे आणि ‘अल् निनो’च्या संकटामुळे खरीप हंगामातील पेरण्या धोक्यात आल्या आहेत. (Monsoon Update)
मृग नक्षत्राच्या आगमनानंतर ज्या पावसाच्या सरींनी धरित्री सुजलाम्-सुफलाम् होणे अपेक्षित होते, तोच मान्सून सध्या महाराष्ट्राच्या वेशीवर रेंगाळला असून खऱ्या अर्थाने 24 आणि 25 जूनच्या सुमारास कोकण पट्टी आणि संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. (Monsoon Update)
मान्सून 8 जून रोजी दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात वेळेत दाखल झाला होता. साधारण 10 ते 15 जून दरम्यान राज्यात सर्वदूर पाऊस सुरू होणे अपेक्षित होते, परंतु 17-18 जून उजाडला तरी मान्सून पुढे सरकलेला नाही. (Monsoon Update)
सध्या मान्सूनची सीमा हर्णे, सोलापूर, हैदराबाद, रांची आणि मुझफ्फरपूर या भागांवर स्थिर आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागांत मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती हळूहळू अनुकूल होत आहे. (Monsoon Update)
महाराष्ट्राच्या बहुतांश भागात 22 जूनपर्यंत केवळ तुरळक पाऊस पडेल. या काळात कुठेही अतिवृष्टी किंवा सर्वदूर मुसळधार पाऊस होणार नाही. खऱ्या अर्थाने 24 आणि 25 जूनच्या सुमारास कोकण पट्टी आणि संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. (Monsoon Update)
विशेषतः 25 ते 28 जूनच्या दरम्यान पश्चिम किनारपट्टीवर अतिवृष्टीचे ढग सक्रिय होत आहेत. 26 आणि 27 जूनच्या सुमारास हा पावसाचा जोर उत्तर कोकणात पोहोचेल. दक्षिण महाराष्ट्राच्या भूमीत मान्सूनची पावले थबकल्यामुळे ४ जून ते १८ जून या पंधरवड्यात देशभरात पावसाची तब्बल ४१ टक्के मोठी तूट नोंदवली गेली आहे. (Monsoon Update)
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, या काळात देशात सरासरी ७२. २ मिमी पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ ४२. ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अनुकूल हवामान घटकांची साथ न मिळाल्याने पावसाने ओढ दिली असून, त्याचा थेट फटका राज्यासह देशातील खरीप पिकांना बसण्याची गडद शक्यता निर्माण झाली आहे. (Monsoon Update)






