दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील लढतीकडे विशेष लक्ष ; ८ मतदारसंघात होणार रंजक लढत

Maharashtra Lok Sabha Election। देशभरात आज दुसऱ्या टप्प्याच मतदान पार पडत आहे. राज्यात आज विदर्भातले बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातले हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान होत आहे. अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या केरळातल्या वायनाड मतदारसंघात आज मतदान होणार आहे.
मतदान केंद्र अधिकारी आणि सर्वच यंत्रणा सज्ज
दुसऱ्या टप्प्यात केरळमधील सर्व 20, कर्नाटकातील 14, राजस्थानमधील 13, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी 8, मध्य प्रदेशातील 6, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी 5, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 3 आणि जम्मू-काश्मीर आणि त्रिपुरामधील 1 जागेचा समावेश आहे. याशिवाय मणिपूरचा 1 भाग म्हणजे मणिपूर बाह्य सीट. लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. मात्र सकाळी 6 वाजता मॉक पोलला सुरुवात झाली. ईव्हीएम व्यवस्थित काम करतंय की नाही हे यातून तपासलं जातं. दरम्यान मतदान केंद्र अधिकारी आणि सर्वच यंत्रणा सज्ज आहे.
लोकसभा चुनाव में आज दूसरे चरण की सभी सीटों के मतदाताओं से मेरा विनम्र अनुरोध है कि वे रिकॉर्ड संख्या में मतदान करें। जितना अधिक मतदान होगा, उतना ही मजबूत हमारा लोकतंत्र होगा। अपने युवा वोटर्स के साथ ही देश की नारीशक्ति से मेरा यह विशेष आग्रह है कि वोट डालने के लिए वे बढ़-चढ़कर…
— Narendra Modi (@narendramodi) April 26, 2024
दुसऱ्या टप्प्यात राज्यात या ठिकाणी मतदान
बुलढाणा- प्रतापराव जाधव (शिवसेना) विरुद्ध नरेंद्र खेडेकर (उबाठा)
अकोला- अनूप धोत्रे (भाजप) विरुद्ध अभय पाटील (काँग्रेस) विरुद्ध प्रकाश आंबेडकर (वंचित)
अमरावती- नवनीत कौर राणा (भाजप) विरुद्ध बळवंत वानखडे (काँग्रेस) विरुद्ध आनंदराज आंबेडकर (रिपब्लिकन सेना) विरुद्ध दिनेश बूब (प्रहार)
वर्धा- रामदास तडस (भाजप) विरुद्ध अमर काळे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
यवतमाळ- वाशिम- राजश्री पाटील (शिवसेना) विरुद्ध संजय देशमुख (उबाठा)
हिंगोली- बाबूराव कदम कोहळीकर (शिवसेना) विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर (उबाठा) शिवाजी जाधव (भाजप बंडखोर)
नांदेड- प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजप) विरुद्ध वसंतराव चव्हाण (काँग्रेस)
परभणी- महादेव जानकर (राष्ट्रवादी) विरुद्ध संजय जाधव (उबाठा)
दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी राज्यात सुरुवात झालीय. त्यातच या टप्प्यातील मतदारसंघातील लढतीत या रंजक होणार असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. त्यामुळे आज कोणत्या ठिकाणी किती मतदान होणार हे पाहणे गरजेचे आहे.





