IAS Transferred : मोठी बातमी..! राज्यातील ६ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ‘या’ महत्त्वाच्या पदांवर मोठे फेरबदल
IAS Transferred : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत अत्यंत मोठा खांदेपालट केला आहे.

IAS Transferred : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रशासनात आणखी एक मोठा खांदेपालट करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री सुमारे ८ वाजता जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार राज्यातील सहा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मुंबई महापालिका, एमएमआरडीए, सिडको आणि एमआयडीसीसारख्या महत्त्वाच्या संस्थांमधील वरिष्ठ पदांवर हे फेरबदल करण्यात आले आहेत. (IAS Transferred )
फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर जवळपास प्रत्येक कॅबिनेट बैठकीच्या दिवशी किंवा त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी होत आहेत. याच परंपरेनुसार यावेळीही प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. (IAS Transferred )
कोणाची कुठे बदली?
- डॉ. अश्विनी जोशी यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदावरून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) येथे अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून बदली करण्यात आली.
- त्यांच्या जागी प्राजक्ता वर्मा (IAS) यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
- विजय सिंघल यांची सिडको (CIDCO) च्या व्यवस्थापकीय संचालक (MD) पदावरून बदली करण्यात आली.
- अश्विन मुदगल यांची सिडकोच्या नवीन व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
- वेलारसू यांची एमआयडीसी (MIDC) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावरून बदली करण्यात आली.
- दीपेंद्रसिंग कुशवाह यांची एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.
गत आठवड्यातही ११ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
- राहुल रंजन महिवाल यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती.
- रुचेश जयवंशी यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती.
- अमित रंजन यांची नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती.
- करिश्मा नायर या जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होणार.
- कान्हुराज बागटे यांची महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये नियुक्ती.
- श्वेता सिंघल यांची नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात विशेष निवासी आयुक्त म्हणून नियुक्ती.
- गीतांजली बाविस्कर यांची नियोजन विभागात सहसचिव म्हणून बदली.
- दिलीप जगदाळे यांची पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात सहसचिव म्हणून नियुक्ती.
- लक्ष्मण राऊत यांची महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती.
राज्य सरकारच्या या सलग प्रशासकीय फेरबदलांमुळे प्रशासन अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मानले जात असून, आगामी काळात आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता व्यक्त केली जात आहे.






