IAS Transfers : महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; चार अधिकाऱ्यांवर नवी जबाबदारी
IAS Transfers : महाराष्ट्रातील प्रशासकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठे फेरबदल करण्यात आले असून, राज्य सरकारने चार वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

IAS Transfers : महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली आहे. राज्य सरकारने चार IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, त्यांना विविध विभागांमध्ये नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. २० नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन आदेश प्रसिद्ध करण्यात आला. (IAS Transfers)
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता आणखी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने अवघ्या दोन दिवसांत एकूण सात अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये बदल झाले आहेत. (IAS Transfers)
या फेरबदलांमध्ये दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ आणि राज्यकर विभागातील महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. अशोक वामन काकडे, प्रवीण कुंडलिक पुरी, गुलाब राजाराम खरात आणि मकरंद प्रल्हाद देशमुख या अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. (IAS Transfers)
कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली?
१. अशोक वामन काकडे : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत असलेल्या अशोक वामन काकडे यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
२. प्रवीण कुंडलिक पुरी : प्रवीण कुंडलिक पुरी यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
३. गुलाब राजाराम खरात : गुलाब राजाराम खरात यांची महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
४. मकरंद प्रल्हाद देशमुख : मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून कार्यरत असलेल्या मकरंद प्रल्हाद देशमुख यांची मुंबई येथे राज्यकर सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. (IAS Transfers)
प्रशासकीय यंत्रणेत महत्त्वाचे फेरबदल
राज्य सरकारने २० नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार या चार अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत झालेल्या सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेत महत्त्वाचे फेरबदल झाले आहेत. (IAS Transfers)
नव्या पदांवर नियुक्त झाल्यानंतर हे अधिकारी कोणत्या पद्धतीने कामकाज करतात आणि संबंधित विभागांच्या कामकाजाला कोणती दिशा मिळते, याकडे आता प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (IAS Transfers)





