Maharashtra Hotels : महाराष्ट्रातील बार, हॉटेल रेस्टॉरंट पहाटे 4 वाजेपर्यंत सुरु राहणार; काय आहे कारण?
Maharashtra Hotels : फुटबॉल रसिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे. फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Hotels : फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील बार, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅफे यांना 19 जुलैच्या मध्यरात्रीपासून 20 जुलैच्या पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Hotels)
अर्जेंटिना विरुद्ध स्पेन अंतिम सामना
फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि स्पेन आमनेसामने येणार असून सामना रात्री 12.30 वाजता सुरू होणार आहे. जगभरातील फुटबॉलप्रेमी हा सामना पाहणार असल्याने राज्य सरकारने विशेष सवलत देण्याचा निर्णय घेतला. (Maharashtra Hotels)
रेस्टॉरंट असोसिएशनची मागणी मान्य
नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI), मुंबई यांनी बार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पहाटेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी केली होती. त्यानुसार सरकारने ही परवानगी दिली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Maharashtra Hotels)
सरकारने स्पष्ट केले आहे की, परवानगीचा गैरवापर झाल्यास किंवा कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित आस्थापनावर कठोर कारवाई केली जाईल. (Maharashtra Hotels)
FIFA Fan Festival मध्ये महाराष्ट्राचा ढोल-ताशा गाजला
दरम्यान, अमेरिकेतील डॅलस येथे सुरू असलेल्या FIFA Fan Festival मध्ये महाराष्ट्राच्या ढोल-ताशाचा दमदार नाद घुमत आहे. ‘शिवम ढोल ताशा पथका’ची या प्रतिष्ठित महोत्सवासाठी करारबद्ध कलाकार म्हणून निवड झाली असून, FIFA Fan Festival मध्ये सादरीकरण करणारे हे पहिले आणि एकमेव भारतीय ढोल-ताशा पथक ठरले आहे. (Maharashtra Hotels)
2014 मध्ये स्थापन झालेल्या या पथकाने अमेरिकेत 330 हून अधिक कार्यक्रम सादर केले असून, अंतिम सामन्याच्या दिवशीही विशेष सादरीकरणाची संधी मिळाल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला जागतिक स्तरावर मोठा गौरव मिळाला आहे. (Maharashtra Hotels)





