Maratha Reservation : मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; जरांगेकडून मुख्यमंत्र्याचे कौतुक
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी फडणवीस सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. आता इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधा लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. (Maratha Reservation)
ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर मराठा समाजासाठी तब्बल 8 विशेष योजना सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. (Maratha Reservation)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे रोजी बेमुदत उपोषण सुरू होते. मात्र सरकारकडून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी मध्यरात्री 14 तासांनंतर आपले उपोषण स्थगित केले होते. त्यानंतर आठवड्याभरात सरकारने मराठा समाजासाठी तीन मोठे निर्णय घेतले आहेत. (Maratha Reservation)
या निर्णयानुसार दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारी शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना आता मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाही लागू होईल. याशिवाय इयत्ता नववी ते बारावीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली विशेष शिष्यवृत्ती योजना मराठा प्रवर्गासाठी विस्तारित करण्यात आली. (Maratha Reservation)
तसेच विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर 16 बाबींबाबतच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती थेट शासनाकडून करण्याची योजना समाविष्ट करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे, परंतु परराज्यात अनुदानित व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या मराठा उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येईल.
इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व घटकांचा अभ्यास आता मराठा समाजासाठी खुला करण्यात आला आहे. सर्व मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आता मराठा समाजातील विद्यार्थी पूर्णपणे पात्र असतील. (Maratha Reservation)
केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया (सीएपी) पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागांवर, प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थास्तरावरील जागांवर प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांनाही इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्व शैक्षणिक सवलती लागू करण्यात येणार आहेत. (Maratha Reservation)
भविष्यात ओबीसी ज्या काही नवीन शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा लागू करण्यात येतील, त्या सर्व सवलती पुढील कोणत्याही नवीन आदेशाची वाट न पाहता मराठा समाजास आपोआप लागू होतील, अशी अत्यंत महत्त्वाची तरतूदही या निर्णयात करण्यात आली आहे. (Maratha Reservation)
दरम्यान, सरकारच्या या घोषणेनंतर आता मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचे आभार मानले आहे. (Maratha Reservation)
जरांगे म्हणाले कि, 30 मे चे आंदोलन झाल्यापासून राज्य सरकारने जी भूमिका घेतली, ती खरंच चांगली आहे. सरकारला गोरगरीब मराठ्यांची मन जिंकायला येतं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि विशेष करून विखे पाटील साहेबांनी आणि लाड साहेबांनी या सगळ्यांनी मिळून मराठा समाजाच्या जेवढ्या मागण्या आहेत. त्या मागण्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाचा न्याय द्यायचा ठरवलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो. (Maratha Reservation)





