राज्य सरकारची मोठी घोषणा ! OBC, SEBC आणि EWS संवर्गातील मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलत

मुंबई : महायुती सरकारने आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणा केल्या आहेत. खास महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. यानंतर आता राज्य सरकारने ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा केली आहे.
काय केली घोषणा?
व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग(एसईबीसी) आणि इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात 50 टक्के सूट होती. आता या शुल्कात सरकराने 100 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या 100 टक्के सूट देण्याच्या निर्णयाने विद्यार्थिंनींना मोठा दिलासा मिळाला आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या ओबीसी मुलींना फी माफी देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी यंदाच्या बजेटमध्ये केली. केवळ मेडिकलच नाही तर अभियांत्रिकी, फार्मसी, मॅनेजमेंट, लॉ अशा विविध शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थिनी याचा फायदा होणार आहे.उद्या याबाबतचा GR निघणार आहे. GR जाहीर जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील OBC, SEBC आणि EWS संवर्गातील मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलतीचा लाभ घेता येणार आहे.





