Maharashtra Election : राज्यात कुणाची सत्ता येणार? महायुती कि महाविकास आघाडी? एक्झिट पोलने वर्तवला अंदाज

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज दिवसभरात मतदान पार पडलं आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालं आहे. या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात सहा महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पडली होती. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी फार कमी टक्के मतदान केलं होतं. पण त्यामानाने विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी उत्सफूर्तपणे प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.
या निवडणुकीत मतदारांनी कुणाला सर्वाधिक पसंती दिली आहे ते येत्या 23 तारखेला स्पष्ट होणार आहेच, पण त्याआधी विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणातून एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात कुणाची सत्ता येऊ शकते जाणून घेऊया…
एक्झिट पोल खालीलप्रमाणे
पोल डायरी
पोल डायरीच्या अंदाजानुसार, महायुतीला राज्यात 122 ते 186 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 69 ते 121 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तर इतर अपक्षांना 12 ते 29 जागांवर यश मिळू शकते.
पी-मार्क
पी-मार्कच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, महायुतीला निवडणुकीत 137-157 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 126-146 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 2 ते 8 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
मॅट्रीझ
मॅट्रीझच्या एक्झिट पोलनुसार, महाविकास आघाडीला राज्यात 110 ते 130 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला 150 ते 170 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
चाणक्य
चाणक्यच्या पोलनुसार, राज्यात महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. अंदाजानुसार महायुतीला 152 ते 160 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.





