धक्कादायक ! नागपूरमध्ये EVM घेऊन जाणारी गाडी फोडली

नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यात काही ठिकाणी तोडफोड, मारामारीच्या घटना घडल्या आहेत. यादरमायन नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनावर हल्ला करून त्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे.
काय घडले नेमके?
मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील किल्ला परिसरात बुथ क्रमांक 268 मधून संध्याकाळी सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. जेव्हा किल्ला परिसरात बुथ क्रमांक 268 वरून ईव्हीएम मशीन घेऊन जाणारी तवेरा गाडी मतदान केंद्रातून बाहेर निघाली, तेव्हा त्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यावेळेस परिसरातील दक्ष नागरिक आणि काही भाजप कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केला आणि पोलिसांना बोलावलं.
मात्र तोपर्यंत हल्लेखोरांनी दगड आणि लोखंडी रॉड्सने हल्ला करत EVM घेऊन जाणाऱ्या तवेरा गाडीची जबर तोडफोड केली आहे. पोलिसांनी माहिती मिळताच लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि ईव्हीएम तसेच तवेरा गाडीमधील शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढलं. तोडफोड करण्यात आलेली तवेरा गाडी पोलिसांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आणली असून ईव्हीएम आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या निश्चित ठिकाणी पोहोचवले आहे.





