Purandhar :…..यामुळे महाराष्ट्र बदनाम: सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका; ‘या’ प्रकरणावरून दिला आंदोलनाचा इशारा, पुरंदरमध्ये नेमक्या काय म्हणाल्या?

पुणेः मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बीड जिल्ह्यामध्ये जे खून झाले आहेत, त्या सर्व प्रकरणांची फाईल उघडल्या गेल्या पाहिजेत. त्याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे ही मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांनी जे व्यक्तव्य केले आहे त्याचा मी जाहीर निषेध केलेला आहे. त्यांनी नैतिकतेचा न पण वापरला नाही, त्यांच्या पक्षात काय चालले आहे हे त्यांनाच माही, असे विधान धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. सासवड येथे पुरंदर तालुका आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. तसेच या बैठकीत त्यांनी तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेतला.
या आढावा बैठकीत सुप्रिया सुळेंनी पुरंदर उपसा सिंचन योजनेतील समस्या जाणून घेतल्या. तसेच पुरंदर तालुक्यात पहिला टँकर आपल्या तालुक्यात सुरू झाल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. पुणे महानगरपालिकेत ११३ जागा भरायच्या आहेत, यासाठी २७००० मुलांनी अर्ज केले आहेत. पण या जागा भरल्या जात नसल्याने सुळेंनी यावर भाष्य केले आहे. जागा भरल्या का जात नाहीत हा प्रश्न मी विचारणार आहे, नाहीतर आंदोलन करावे लागेल, असा इशारा सुप्रिया सुळेंनी यावेळी बोलताना दिला आहे. तसेच आंदोलनाशिवाय या सरकारच्या काळात काहीच मिळत नाही, असे देखील त्या म्हणाल्या आहेत.
देशमुख प्रकरणात न्याय मिळालाच पाहिजे: सुप्रिया सुळे
खंडणी झाली, खून, हिंसाचार, शेतकरी यांची फसवणूक झाली, अजून काही करायचे राहिले आहे का, कुठला गुन्हा राहिला आहे. यातील आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, ज्या गोष्टी बाहेर ऐकायला मिळतात त्या भयंकर आहेत, यामुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे. लोकांनी यांना विश्वासाच्या नात्याने सत्ता दिली, पण तुम्ही कुठलाच गुन्हा सोडला नाही. व्हिडिओमधले फोटो पाहून त्यांच्या कुटुंबातील लोकांना काय वाटत असेल, किती यातना होत असतील. या विषयावर जनतेच्या भावना तीव्र आहेत न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना केली.
उड्डाणपूलास मंजुरी
संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील वाळूंज फाटा, शिवरी, ता. पुरंदर येथे महात्मा जोतीराव फुले विद्यालयाच्या जवळ उड्डाणपूल करण्यात येत आहे. या उड्डाणपूलास विद्यार्थी व नागरीकांना ये-जा करता यावी यासाठी अंडरपास करण्यात यावा अशी मागणी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे केली होती. या मागणीला मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून येथे अंडरपास मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी त्यांच्या एक्सवरील अकाऊंटवरून शेअर केली आहे.
संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील वाळूंज फाटा, शिवरी, ता. पुरंदर येथे महात्मा जोतीराव फुले विद्यालयाच्या जवळ उड्डाणपूल करण्यात येत आहे. या उड्डाणपूलास विद्यार्थी व नागरीकांना ये-जा करता यावी यासाठी अंडरपास करण्यात यावा अशी मागणी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री…
— Supriya Sule (@supriya_sule) March 5, 2025





