Pune News : आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

पुणे : आज एक मे 2025 रोजी महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होत आहे. त्याचबरोबर श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमधील सर्व शिक्षकांनी आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात येऊन महाराष्ट्र दिन साजरा केला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवलाल धनकुडे, अध्यक्ष सुरेखाताई धनकुडे, सेक्रेटरी विराज धनकुडे, ट्रेझर राहुल धनकुडे, सीईओ सुषमा भोसले, आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य रेखा काळे, जुनिअर कॉलेजच्या प्राचार्य कोमल शिंदे तसेच सर्व कॉर्डिनेटर्स आणि शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.
अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याबरोबरच राष्ट्र गायन करून महाराष्ट्र गीत देखील शिक्षकांनी गायले. यावेळी मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व इतर शिक्षकांना सांगितले. तसेच संस्थेच्या सीईओ यांनी महाराष्ट्र दिनाबद्दल शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

