Maharashtra Corona: राज्यात आज फक्त 362 नवीन करोनाबाधितांची नोंद

मुंबई – राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट होताना दिसून येत आहे. राज्यात रविवारी 362 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत 688 रुग्णांनी करोनावर मात केली असून सध्या 3,709 सक्रिय रुग्ण आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या महितीनुसार, राज्यात दिवसभरात 362 नवीन करोनाबाधित आढळून आले आहे. मागील 24 तासांत राज्यात 688 जणांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील एकूण करोनामुक्त रुग्णांची संख्या 77,17,362 इतकी झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 98.08 टक्के इतका झाला आहे. राज्यातील 18 जिल्ह्यामध्ये आज एकाही करोनाबाधित रुग्णांची नोंद नाही.
दुसरीकडे, राज्यात आज 61 नव्या ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 5726 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आजपर्यंत चार हजार 733 जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.





