Maharashtra Oath Ceremony : देवेंद्र फडणवीसांसोबत आज कोण घेणार शपथ; ‘ही’ अपडेट आली समोर

मुंबई : आज देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधीस काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. आज देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कोण शपथ घेणार, याची माहिती समोर आली आहे.
आज कोण घेणार शपथ?
आजच्या शाही शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहे. त्याशिवाय उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे शपथ घेणार आहेत. या तिघांशिवाय इतर कोणाचाही मंत्री म्हणून शपथविधी पार पडणार नाही. आमदारांचा मंत्री म्हणून शपथविधी हा राजभवनात ७ डिसेंबर रोजी पार पडणार आहे.
मोदींच्या उपस्थितीत पार पडणार सोहळा
मुंबईतील आझाद मैदानावर आज महायुती सरकारचा शाही शपथविधी सोहळा होणार आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर जवळपास 14 दिवसांनी शाही शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, महायुतीचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
मंत्रीपदाबाबत अजूनही सस्पेन्स कायम
आजच्या शपथविधीनंतर उर्वरित आमदारांचा शपथविधी हा 7 डिसेंबर रोजी राजभवनात होणार आहे. 7 डिसेंबर रोजी राजभवनात 31 आमदारांना मंत्री पदाची शपथ दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र, कोणत्या पक्षाला कोणते खातं मिळणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.
हे पण वाचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! आज मुंबईत आझाद मैदानावर होणार भव्यदिव्य शपथविधी सोहळा





