मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या आयुष्यावर येणार नाटक; उलघडणार नाट्यमय राजकीय खेळीचा डाव
Updated On:

मुंबई : मागच्या दोन वर्षांत महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यावर आधारीत नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे एकपात्री नाटक असणार आहे. यामधून एकनाथ शिंदे यांच्या नाट्यमय राजकीय खेळीचा डाव उलगडला जाणार आहे.
काय आहे नाटकाचे नाव?
‘मला काही सांगायचंय’ असे या नाटकाचे नाव असणार आहे. यामधून एकनाथ शिंदे यांच्या नाट्यमय राजकीय खेळीचा डाव उलगडला जाणार आहे. या एकपात्री नाटकातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय सांगणार याची जनतेला उत्सुकता लागली आहे.
या एकपात्री नाटकात मुख्य भूमिका अभिनेता संग्राम समेळ साकारणार आहे. येत्या दोन दिवसात नाटकाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या हे नाटक सेन्सॉर बोर्डाकडे असल्याची माहिती समोर आली आहे.





