“श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद द्या” ; एकनाथ शिंदेच्या मागणीने भाजपसमोर नवा पेच

Maharashtra CM। राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. मात्र यात महायुतीमध्येच पेच निर्माण झाला आहे. कारण सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी आपल्यालाच पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी जोरदार वातावरणनिर्मिती करुन भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, 137 आमदारांचे पाठबळ असलेल्या भाजपने हा दबाव झुगारुन देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा स्पष्ट संदेश एकनाथ शिंदे यांना दिला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमधून माघार घेतली. परंतु ही माघार घेत असताना शिंदेनी महायुतीसमोर मोठा प्रस्ताव सादर केला आहे. ज्यामुळे भाजप आणि एकूणच महायुतीच्या नेते संकटात सापडले असल्याचे दिसत आहे.
“श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद द्या” Maharashtra CM।
एका इंग्रजी वर्तमानतरच्या माहितीनुसार, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या मोबदल्यात केंद्रात महत्त्वाच्या खात्याचे मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर दिली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही ऑफर्स फेटाळल्या आहेत. त्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी एक नवा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे. “मला राज्यात मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर मला महायुती सरकारचा संयोजक हे पद द्यावे. कारण राज्यातील विधानसभा निवडणूक ही माझ्या नेतृत्त्वाखाली लढवण्यात आली होती, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. तसेच आपला मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे,” अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या या मागणीने भाजप आणि महायुतीचे नेते बुचकाळ्यात पडले आहेत. भाजपने अद्याप या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याबाबत भाजपच्या वर्तुळात अद्याप विचार सुरु असल्याने सरकारच्या शपथविधीला उशीर होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या ऑफरबाबत आता भाजपच्या थिंक टँकमधील नेते काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद सोडण्यास राजी असले तरी श्रीकांत शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांना कितपत रुचेल, हे बघावे लागेल. कारण कालपर्यंत दिल्लीतील राजकारणाशी संबंध असलेल्या श्रीकांत शिंदे यांना थेट अजित पवारांच्या पंक्तीला आणून बसवणे, कितपत योग्य ठरेल, हा प्रश्न आहे.
अजित पवारांच्या ‘त्या’ खेळीने शिंदेंचा डाव फिस्कटला Maharashtra CM।
महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यातील विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही आमचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपला 132 जागा जिंकल्यामुळे प्रचंड मोठे यश मिळाले. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरील भाजपचा दावा भक्कम झाला होता. परंतु, एकनाथ शिंदे यांनी किमान अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मिळावे, ही मागणी लावून धरली होती. परंतु, अजितदादा गटाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देऊन शिंदे गटाचा डाव फिस्कटला असल्याचे दिसून येत आहे.





