Maharashtra Cabinet : महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणी घेतली शपथ? वाचा नेत्यांचा कार्यकाळ

Maharashtra Cabinet Expansion । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज नागपूर येथे पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली मंत्रिपदाची शपथ घेतली.
यामध्ये भाजपच्या सर्वाधिक 19, शिवसेना (शिंदे गट) 11 तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली.. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (शपथविधी सोहळा) पार पडला.
गणेश नाईक:
गणेश नाईक यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते ठाणे जिल्ह्यातील ते वजनदार नेते आहेत. 1990 मध्ये पहिल्यांदा ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते.
हसन मुश्रीफ:
हसन मुश्रीफ 6 वेळा आमदार. ते राष्ट्रवादीमध्ये ग्रामविकास मंत्री होते. कामगार मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. जलसंपदा, विधी आणि न्याय, पशु संवर्धन आणि दुग्ध विकास, शिक्षण खात्यांमध्ये त्यांनी काम पाहिलं. पश्चिम महाराष्ट्रातले एकमेव अल्पसंख्याक नेते. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय.
गिरीश महाजन:
ते जामनेर मतदारसंघातून 7 वेळा आमदार. 10 वर्ष मंत्रिपद भूषपलं. ग्रामविकास, युवा कार्य आणि क्रीडा, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा या खात्याचं मंत्रिपद त्यांनी भूषवलं. शिक्षकाचा मुलगा, आमदार ते मंत्री असा प्रवास. त्यांनी महसूल मंत्री म्हणून जबाबादारी पार पाडली आहे.
चंद्रकांत पाटील:
मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील हे पूणे कोथरुड येथून दूसऱ्यांदा निवडून आले आहे. फडणवीस सरकारमध्ये पहिल्यांदा महसूलमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ते उच्च व तंत्रशिक्ष्रण मंत्री होते. आता तिसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतली आहे.
गुलाबराव पाटील:
गुलाबराव पाटील हे जळगावचे असून त्यांनी यापूर्वी स्वच्छता व पाणीपूरवठा मंत्रीम्हणून जबाबदारी सांभाळली आहे. जळगाव ग्रामीणमधून ते सलग पाच वेळा निवडून आले आहेत. शिवसेनेचे शाखाप्रमूख ते मंत्री असा प्रवास त्यांचा राहिला आहे.
दादा भुसे:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकनिष्ठ आणि जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. 2004 साली पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले आहे. शक्य ते अशक्य अशी ओळख असणारा नेता म्हणून ओळख. मागील दोन सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदे भूषवली आहेत.
संजय राठोड:
संजय राठोड यांनी तिसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. बंजारा समाजाचे नेते, 2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते.
पंकजा मुंडे:
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली. त्या फडणवीसांच्या पहिल्या सरकारमध्ये ग्रामविकासमंत्री होत्या. 2009 व 2014 मध्ये परळीमधून आमदार होत्या. त्या सध्या विधानपरिषदेच्या आमदार आहेत. मुंडे यांचा गेल्या 5 वर्षातील राजकीय वनवास अखेर संपला आहे. त्यांनी आज दुसऱ्यांदा मंत्री म्हणून शपथ घेतली.
जयकुमार रावल:
भाजपचे नेते जयकुमार रावल यांनी शपथ घेतली, सिंदखेडा मधून ते निवडून आले आहेत. 2009 पासून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत.
उदय सामंत:
उदय सामंत एकनाथ शिंदेच्या बंडातील प्रमुख शिलेदार होते.रत्नागिरी मतदारसंघातून 5 वेळा आमदार, मागील दोन्ही सरकामध्ये ते मंत्री होते.
शंभुराज देसाई:
शिवसेना आमदार शंभुराज देसाई यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. चार वेळा आमदार. मागील सरकारमध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री
आशिष शेलार:
भाजप आमदार आशिष शेलार यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. 3 वेळा आमदार. मागील सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री
शिवेंद्रराजे भोसले:
भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. पाचव्यांदा आमदार. अंजिक्यतारा साखर कारखाना ते सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष. पहिल्यांदाच मंत्रीपदाची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ते वंशज आहेत.
आदिती तटकरे:
राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. राष्ट्रवादी शिंदे सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्री होत्या. त्याआधी ठाकरे सरकारमध्ये उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा आणि युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती आणि जनसंपर्क या खात्यांच्या राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं.
नरहरी झिरवळ:
नरहरी झिरवळ यांनी शपथ घेतली. सरपंच, पं.स अध्यक्ष ते जिल्हा परिषद अध्यक्ष राहिले आहेत. दिंडोरी मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार, विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
जयकुमार गोरे:
भाजपचे जयकुमार गोरे हे तिसऱ्यांदा मंत्री पदाची शपथ घेत आहेत. माण-खटाव मतदासंघातून चौथ्यांदा आमदार. 2014 काँग्रेसकडून आणि 2019 मध्ये भाजपमधून ते निवडून आले आहेत.
भरतशेठ गोगावले:
भरतशेठ गोगावले हे सरपंच ते आमदार असा प्रवास रायगडमधील शिंदेसेनेचा आक्रमक चेहरा, पहिल्यांदाच मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. महाड मतदारसंघातून सलग चौथ्यांदा ते निवडून आले आहेत. 1992 पासून ते राजकारणात सक्रीय आहेत.
प्रकाश आबिटकर:
पहिल्यांदा मंत्री पदी शपथ घेतली. ते 2014 पासून सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. गारगोटी पंचायत समितीचे अध्यक्ष होते. कोल्हापूरातील राधानगरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व. एकनाथ शिंदेच्या बंडामध्ये त्यांचा सहभाग होता. 2019 आणि 220 मध्ये उत्कृष्ट संसदपट्टू म्हणून पुरस्कार पटकावला आहे.
बाबासाहेब पाटील:
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर मतदासंघातून निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँगेसकडून त्यांना संधी मिळाली आहे. ते अजित पवार यांच्या बंडानंतर ते त्यांच्या बरोबर राहिले होते.
नितेश राणे:
नितेश राणे यांनी पहिल्यांदाच मंत्रीपदाची शपथ, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे ते पूत्र आहेत. कणकवली मतदारसंघातून कोकणातील आक्रमक चेहरा, 2014 पासून सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवणून आले आहेत.
आकाश फुंडकर:
यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. माजी मंत्री भाऊसाहेब फुंडकर याचे ते पुत्र आहेत. सलग 3 वेळा खामगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व.





