Maharashtra Cabinet Expansion : शिवसेनेच्या संभाव्य 12 मंत्र्यांची यादी आली समोर

मुंबई : राज्यातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. कारण मंत्रीमंडळाच्या फॉर्म्युल्यावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समोर आले आहे. या महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला एकूण 9 मंत्रीपदं आणि 3 राज्यमंत्रीपदं मिळणार आहेत. या मंत्रीमंडळात कोणाला संधी देण्यात येणार याची संभाव्य यादी समोर आली आहे.
या मंत्रीमंडळात नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना संधी देऊन एकनाथ शिंदे यांनी योग्य संतुलन राखले आहे. शिवसेना मंत्र्यांच्या संभाव्या यादीवर नजर टाकल्यास भाजपचा विरोध असलेल्या आमदारांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्याचे दिसत आहे. यामध्ये दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, संजय राठोड यांना मंत्री मंडळातून डच्चू देण्यात आल्याचे समजत आहे.
शिवसेनेचे संभाव्य कॅबिनेट मंत्री
एकनाथ शिंदे
उदय सामंत
शंभुराज देसाई
दादा भुसे
प्रताप सरनाईक
संजय शिरसाट
गुलाबराव पाटील
भरत गोगावले
शिवसेनेचे संभाव्य राज्यमंत्री
योगेश कदम
विजय शिवतारे
राजेंद्र यड्रावकर किंवा प्रकाश आबिटकर





