Maharashtra Budget Session Live : विधानसभा कामकाज पूर्ण दिवसासाठी स्थगित, सोमवारी कामकाज होणार

मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला दुसरा दिवस असून मुंबई येथे प्रारंभ होत आहे. या अधिवेशनामध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार असल्याने या अधिवेशनाचे महत्त्व जास्त आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये झालेल्या विविध प्रकारच्या अधिवेशनावर नजर टाकली तर या अधिवेशनात काही भरीव घडेल की नाही, याबाबत शंका निर्माण होत आहे. अर्थात, अर्थसंकल्प सादर करून मंजूर करून घेण्याचा उपचार जरी पार पाडला जाणार असला तरी हे अधिवेशन शांततेच्या आणि सौहार्दाच्या वातावरणात पार पडेल की नाही याबाबत आतापासूनच शंका येऊ लागली आहे.
Maharashtra Budget Session Live:
– एसटी विलीनीकरणचा अहवाल आज सभागृहात ठेवला जाणार, मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाल्यांनतर आज सभागृहात मांडणार
– भाजप आमदार ओबीसी बचाव टोपी घालून विधान सभेत दाखल
– छगन भुजबळ पण ओबीसी बचाव टोपी घालून सभेत दाखल
– ओबीसी आरक्षण नाकारलं नाही – छगन भुजबळ
– विधानसभेत ओबीसी आरक्षणावरील चर्चेत गोंधळ, फडणवीस-भुजबळ आमनेसामने, भाजप आमदार आक्रमक, वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी
ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलं, २० मिनिटासाठी सभागृह तहकूब
– OBC आरक्षण मिळू नये यासाठी भुजबळांवर कुणाचा दबाव आहे? फडणवीस आक्रमक
LIVE | Media interaction at Vidhan Bhavan, Mumbai#BudgetSession #Maharashtra #MaharashtraBudgetSession #OBC https://t.co/nU218rpuGa
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 4, 2022
– २० मिनिटानंतर पुन्हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात
– एसटी संदर्भात अहवालाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता, मंत्री अनिल परबांनी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला
– ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार नवा कायदा करणार, सोमवारी विधेयक मांडणार: अजित पवार
– विधानसभा कामकाज पूर्ण दिवसासाठी स्थगित, सोमवारी कामकाज होणार





