Maharashtra Budget 2023-2024 Live : लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची… ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात

Updated On:

आर्थिक विकासदरात 6.8 टक्‍क्‍यांची वाढ अपेक्षित

दरडोई उत्पन्न वाढून 2.42 लाखांवर

मुंबई : महाराष्ट्राचा यंदाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत मांडत आहेत. त्यामुळे फडणवीस आपल्या पेटाऱ्यातून राज्याला काय देणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचा यंदाचा आर्थिक पाहणी अहवाल फडणवीस यांनी आज सादर केला. त्यानुसार, राज्याच्या आर्थिक विकासदरात 6.8 टक्‍क्‍यांची वाढ अपेक्षित आहे. उद्योगात 6.1 टक्‍के, तर कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रात 10.2 टक्‍क्‍यांची वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

-महिलांसाठी राज्यात 50 नवी वसतीगृह उभारणार

-महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार

-महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट

-लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची… ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात

-नमो शेतकरी योजनेची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा,

-काजू फळ विकास योजना

-महाराष्ट्रातील विविध प्रकल्पासाठी 36 हजार कोटींची तरतूद

-विधासभेत अर्थसंकल्प सादर, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बजेटचं वाचन सुरू

-गरीब आणि कष्टकरी लोकांना या बजेटचा फायदा व्हावा- दिलीप वळसे पाटील

 

५० खोके, नागालँड ओके असं झालंय का? – गुलाबराव पाटील

कसब्यातील पराभव भाजपच्या जिव्हारी; शहर नेतृत्व बदलाचे संकेत, ‘ही’ दोन नावं चर्चेत…

राज्याचा आज अर्थसंकल्प; ‘या’ क्षेत्राला मिळणार मोठा दिलासा….

 

राज ठाकरेंबद्दल एकच सांगेन, दिलदार मनाचा राजा – रवींद्र धंगेकर

-शेतकऱ्यांकडे सरकारच दुर्लक्ष – रवींद्र धंगेकर नेमकं काय म्हणाले

 

-अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीवर भर द्यावा, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करावं : अशोक चव्हाण

– पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं अर्थसंकल्प नसावा, सामान्य लोकांचा अर्थसंकल्प हवा : रोहित पवार

 


सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय – नाना पटोले

 

 

– तुमच्यासारखं आम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पानं नाही पुसली. आम्ही १२ हजार कोटी रुपये दिले. तुम्ही ५० हजार कोटी रुपये देतो म्हणाले, पण दिले नाही. आम्ही दिले ते – एकनाथ शिंदे

 

 

– पंचनामे होताच मदत दिली जाईल – एकनाथ शिंदे

– सरकार म्हणतंय खरेदी सुरू झालीये, पण… – अजित पवार

 

 

– जळगाव जिल्ह्यात जलसंधारण विभागामार्फत दोन बंधाऱ्यांना मंजुरी देण्यात आली. यापैकी एका प्रकल्पातून पंधरा लाख तर दुसऱ्या प्रकल्पातून पाच लाख रुपये चुकीच्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. हे प्रकरण उघडकीस आल्यावर अनेक सामाजिक संघटनांनी याविरोधात तक्रार दाखल केली. यावर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाची दखल घेतली. या चौकशीत समोर आलेल्या दोषींवर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार अनिल पाटील यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत केली.

– नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप आणि रवींद्र धंगेकर यांनी घेतली शपथ

– सर्वसामान्यांच्या अपेक्षांवर मुख्यमंत्री खरे उतरतील- संयज शिरसाट यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया

 

आणखी संबंधित बातम्या

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

2026-10-06 17:29:48

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

2026-10-06 11:55:05

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

Chandrashekhar Bawankule : "दुष्काळी परिस्थिती गंभीर, कोरोना महामारीपेक्षाही हे मोठे संकट असल्याने उत्सवांवर..."; बावनकुळेंचे आवाहन

2026-10-06 09:38:41

Chandrashekhar Bawankule : "दुष्काळी परिस्थिती गंभीर, कोरोना महामारीपेक्षाही हे मोठे संकट असल्याने उत्सवांवर..."; बावनकुळेंचे आवाहन