महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमात लोकांना बसवले उन्हात; 123 जणांना उष्मघात

ठाणे – ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी तीव्र उष्णतेमुळे 120हून अधिक लोकांना उष्मघाताचा त्रास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील 13 जणांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
खारघर येथील 306 एकर जागेवर झालेल्या भव्य कार्यक्रमाला धर्माधिकारींचे लाखो अनुयायी उपस्थित होते. या कार्यक्रमास सकाळी 11.30च्या सुमारास सुरू झाली. हा कार्यक्रम दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू होता. याप्रसंगी उपस्थितांसाठी बसण्याची व्यवस्था उघड्यावर करण्यात आली होती.
यामुळे तीव्र उष्णतेमुळे कार्यक्रमादरम्यान एकूण 123 जणांना डिहायड्रेशनसारख्या तक्रार जाणवू लागल्या. त्यानंतर त्यांना तात्काळ कार्यक्रमस्थळी उभारलेल्या 30 मेडिकल बूथमध्ये पाठवण्यात आले. यापैकी 13 रुग्णांना पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.


