Ashok Saraf यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर..

मुंबई – 2023 वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांच्याशी बोनवर बोलून त्यांचे अभिनंदन देखील केल्याचे समजते. नाटक,मराठी चित्रपट याच्या व्यतिरिक्त अशोक सराफ यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
अशोक सराफ यांना हा पुरस्कार जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी एक ट्विट देखील केले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात,”ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले असल्याचे या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे देखील मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे.
ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा #महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले.
अशोक सराफ यांनी… pic.twitter.com/u7F6KkDe8z
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 30, 2024





