Maharashtra Assembly Election 2024 । महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील (MVA) जागावाटपावर अखेर एकमत झाले असून आज शिवसेना ठाकरे गटाच्या पाठोपाठ काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
या यादीत एकूण २ ३ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीतमध्ये भुसावळ, वर्धा, अकोट या मतदारसंघांचा सुद्धा समावेश आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन चर्चा सुरु असून हळूहळू बैठकानंतर उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येत आहे. त्यानुसार काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील कामठी मतदार संघातून सुरेश भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
२३ उमेदवारांची नावे आणि मतदारसंघ (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress 2nd Candidates List)
भुसावळ – राजेश मानवतकर
जळगाव – स्वाती वाकेकर
अकोट – महेश गणगणे
वर्धा – शेखऱ शेंडे
सावनेर – अनुजा केदार
नागपूर दक्षिण – गिरिश पांडव
कामठी – सुरेश भोयर
भंडारा – पूजा ठवकर
अर्जुनी मोरगाव – दिलिप बनसोड
आमगाव – राजकुमार पुरम
राळेगाव – वसंत पुरके
यवतमाळ – अनिल मांगुलकर
आर्णी – जितेंद्र मोघे
उमरखेड – साहेबराव कांबळे
जालना – कैलास गोरंट्याल
औरंगाबाद पूर्व – मधुकर देशमुख
वसई – विजय पाटील
कांदिवली पूर्व – काळू बधेलिया
चारकोप – यशवंत सिंग
सायन कोळीवाडा – गणेश यादव
श्रीरामपूर – हेमंत ओगले
निलंगा – अभय कुमार साळुंखे
शिरोळ – गणपतराव पाटील
काँग्रेसने 2019 विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवलेल्या?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती होती. त्यामुळे काँग्रेसने राज्यात 147 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 121 जागा लढवल्या होत्या. त्याआधी म्हणजे 2014 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती तुटली होती. त्यामुळे त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या.