Maharashtra Election : ‘या’ 92 वर्षीय नेत्याने काँग्रेसकडे मागितली उमेदवारी

धाराशिव : राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आता इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. निवडणुकीची घोषणा झाली असली तरी मविआ किंवा महायुतीच्या कोणत्याच पक्षाने जागावाटप आणि उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. महाविकास आघाडीत जागा वाटप अंतिम टप्प्यात असताना आता वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
‘या’ नेत्याने काँग्रेसकडे मागितली उमेदवारी
92 वर्षीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर चव्हाण यांनी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली आहे. ते तुळजापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे समजत आहे. मधुकर चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना तिकीट दिलं गेल्यास तुळजापुरात मधुकर चव्हाण विरुद्ध भाजपचे आमदार राणा पाटील यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
भाजपचे आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा लढल्या होत्या. मात्र त्यांना निवडणुकीत मविआचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांचा ३ लाखांपेक्षा जास्त मताधिक्क्याने पराभव केला होता. आता राणा पाटील हे तुळजापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदार संघात मधुकर चव्हाण आणि राणा पाटील यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.





