Maharashtra Assembly Election 2024 : मनसे खातं उघडणार का? आकडेवारी एकदा पाहाच….

Maharashtra Assembly Election 2024 । Raj thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय वर्तुळात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढतीमध्ये कोण जिंकून येणार? कुणाची पीछेहाट होणार? यावरून मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 130 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे केले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला अनुकूल वातावरण असं दिसत होतं. पण प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अशी स्थिती दिसत नाहीय.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. त्यानंतर या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज शनिवार 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार होताना दिसत आहेत.
मतमोजणी सुरु होऊन आता दीड तासापेक्षा जास्त वेळ झालाय. पण मनसेचा उमेदवार एकाही जागेवर आघाडीवर नाहीय. सुरुवातीला माहीम विधानसभा मतदारसंघात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी आघाडी घेतली होती. पण आता ते पिछाडीवर आहेत.
बाळा नांदगावकर यांना अजूनपर्यंत अजय चौधरींची आघाडी मोडता आलेली नाहीय. ठाणे शहर या मतदारसंघातून मनसेला अपेक्षा होत्या. ठाणे शहरमधून जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव निवडणूक लढवत आहेत. पण भाजपचे संजय केळकर आघाडीवर आहेत.
माहीम विधानसभा मतदारसंघातून आता उद्धव ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी आघाडी घेतली आहे. अमित ठाकरे यांच्याकडे 2156 तर महेश सावंत यांना 2,270 मतं आहेत. सदा सरवणकर तिसऱ्या स्थानावर आहेत. आता येणारी आकडेवारी आणखी काय सांगते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





