Maharashtra Assembly Election: शरद पवारांच्या 10 दिवसांत 40 सभा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra Assembly Election Sharad Pawar Rally : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते मैदानात उतरले आहेत. राज्यात ठिकठिकाणी सर्वपक्षीय नेत्याच्या प्रचार सभा होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या पुढील 10 दिवसात तब्बल 40 सभा होणार आहेत.
शरद पवार आज (9 नोव्हेंबर) उदगीर, परळी, आष्टी आणि बीड विधानसभेसाठी सभा घेणार आहेत. यावेळी ते सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधताना दिसणार आहेत. शरद पवारांच्या आगामी विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रकही समोर आले आहे. शरद पवार हे शेवटची सभा ही बारामतीमध्ये युगेंद्र पवारांसाठी घेणार आहेत.
शरद पवार कुठे किती सभा घेणार?
9 नोव्हेंबर – उदगीर, परळी, आष्टी, बीड
10 नोव्हेंबर- परंडा, शेवगाव, गंगापूर, घनसावंगी
11 नोव्हेंबर- एरंडोल, सिंदखेडा, जामनेर, मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण
12 नोव्हेंबर- कळवण, दिंडोरी, निफाड, सिन्नर, येवला, कोपरगाव
13 नोव्हेंबर- रहाता, श्रीवर्धन, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, भोसरी
14 नोव्हेंबर- चिंचवड/पिंपरी रॅली
15 नोव्हेंबर – तासगाव कवठे महाकाळ, चंदगड, कराड उत्तर
16 नोव्हेंबर – वाई, कोरेगाव, माण, फलटण
17 नोव्हेंबर – करमाळा, माढा, कर्जत जामखेड
18 नोव्हेंबर – भोर, दौंड, इंदापूर, बारामती
मतदानाला अवघे 11 दिवस बाकी –
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुक मतदानासाठी अवघे 11 दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळत आहे.





