मुंबई :– महाविकास आघाडीचेच राज्यामध्ये सरकार येत आहे. राज्यात आघाडीचे सरकार आल्यानंतर केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार देखील डळमळीत होणार आहे. त्यामुळे अख्या देशाचे लक्ष महाराष्ट्रावर लागले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या राज्यांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार येत असल्याचे आम्हाला खात्री असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्ष जाहिरातीवर तरलेला पक्ष आहे. जाहिरातीवरच पैसा खर्च करून 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेवर आले आहेत. 2014 मध्ये त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट जाहिराती केल्या होत्या. आता दहा वर्षानंतरची परिस्थिती पाहिली तर नरेंद्र मोदी यांनी या देशांमध्ये फार मोठी क्रांती केलेली दिसत नाही. किंवा नवीन आधुनिक हिंदुस्तान घडवला असे कधीही दिसले नाही. किंबहुना आहे तो भारत देश सुद्धा त्यांनी मागे ओढला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
Maharashtra Assembly Election 2024 : मोदी युगाचा लवकरच अस्त होणार – शरद पवार
नरेंद्र मोदी शिवतीर्थावर सभा घेत आहेत. सध्या ते पंतप्रधान आहेत, त्यांनीच बसवलेले गुलामाचे सरकार महाराष्ट्रावर आहे. वास्तविक शिवतीर्थाला एक इतिहास आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची समाधी देखील तेथेच आहे. त्या समाधीला स्मरुन मोदींनी सांगावे की, महाराष्ट्र तोडण्यासाठी, मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी त्यांनी शिवसेना फोडली की नाही. हे त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावे. त्यांच्यात जर तेवढी हिंमत असेल तर आम्ही पाहू असे म्हणत राऊत यांनी मोदींना आव्हान दिले आहे.