Maharashtra Assembly Election 2024 – पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ या चार विधानसभा मतदारसंघात सकाळी 11 पर्यंत महायुतीचे उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच महायुतीचे उमदेवार आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे विरुद्ध महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या सुलक्षणा शिलवंत यांच्यात लढत असून आमदार अण्णा बनसोडे 24 हजार 718 मतांनी आघाडीवर आहेत. चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुती भाजपचे उमेदवार शंकर जगताप अकराव्या फेरीत 43 हजार 373 मतांनी आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे राहुल कलाटे यांच्यासोेबत थेट लढत आहे. भोसरी : सर्वाधिक चुरशीची लढत भोसरी विधानसभा मतदारसंघात असून महायुती भाजपचे उमदेवार आमदार महेश लांडगे आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्यात थेट लढत आहे. भाजपचे महेश लांडगे सहाव्या फेरीअखेर 16718 मतांनी आघाडीवर आहे. मावळ : मावळ मतदारसंघात महायुतीच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके 64 हजार 631 मतांनी आघाडीवर आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीने उमेदवार दिला असून अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिला आहे.