Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्रिपदाचा महासस्पेन्स; सरकार स्थापण्याची लगबग सुरू !
Updated On:

Maharashtra Assembly Election 2024 – विधानसभा निवडणुकीत महाविजय मिळवून महाराष्ट्राची सत्ता राखलेल्या महायुतीच्या गोटात नवे सरकार स्थापण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र, सरकारच्या रचनेविषयी आणि मुख्यत्वे मुख्यमंत्रिपदाविषयी महासस्पेन्स निर्माण झाला आहे.
महायुतीने घवघवीत यश मिळवताना तीन-चतुर्थांश बहुमत प्राप्त केले. त्या यशात भाजपचा वाटा मोठा राहिला. त्या पक्षाने आजवरची उच्चांकी कामगिरी केली. त्यातून सत्तासमीकरणे बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
मुख्यमंत्रिपदावर हक्काने दावा करता येऊ शकेल इतक्या मजबूत स्थितीत भाजप पोहचला आहे. मात्र, त्या पदावर भाजपने दावा केल्यास शिंदेसेना काय भूमिका घेणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. नव्या सरकारच्या रचनेविषयीचे चित्र उद्या (सोमवार) स्पष्ट होऊ शकेल.





