“लोकशाहीत मतदान करणे हे नागरिकांचे कर्तव्य” ; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मतदारांना आवाहन

Maharashtra Assembly Election 2024 । राज्यातील 288 विधानसभा मतदार संघात आज 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. यासाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा तयार आहे. राज्यात एकूण 4 हजार 136 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. दरम्यान, आजच्या या मतदानासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात मतदान केले. त्यांनी लोकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी, “लोकशाहीत मतदान करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाने हे कर्तव्य बजावले पाहिजे. मी उत्तरांचलमध्ये होतो, पण मी मतदान करण्यासाठी काल रात्री येथे आलो. प्रत्येकाने मतदान केले पाहिजे… ” असे म्हणत त्यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
#WATCH | Nagpur, Maharashtra: RSS Chief Mohan Bhagwat says, “In a democracy, voting is a citizen’s duty. Every citizen should perform this duty. I was in Uttaranchal, but I came here last night to cast my vote. Everyone should vote…”#MaharashtraAssemblyElections2024 https://t.co/TPje6eCYg2 pic.twitter.com/U6ePRamY7f
— ANI (@ANI) November 20, 2024
दरम्यान ,राज्यात एकूण 4 हजार 136 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. तर शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, पक्ष फुटीनंतर राज्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणूका पार पडत आहेत. यासाठी गेल्या महिनाभरापासून राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला होता. यातच आता महायुती आणि महाविकास आघाडीनेही कंबर कसल्याचं दिसून आले.





