ऑनलाईन ऑर्डर करणे पडले महागात..! Ice cream कोनमध्ये आढळला चक्क तुटलेल्या बोटाचा तुकडा

Mumbai Malad News । सर्वांचा आईस्क्रीम खूप आवडत असते. लहान्यांपासून ते मोठ्या पर्यंत सर्वच जन आवडीने आईस्क्रीम खात असतात. मात्र मुंबईत आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला आहे. मलाड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी तात्काळ ते मानवी बोट फॉरेन्सिककडे पाठवण्यात आले आहे. आईस्क्रीम ज्या ठिकाणी बनवले आणि पॅक केले त्याचाही शोध घेण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
Maharashtra | A woman found a piece of human finger inside an ice cream cone that was ordered online in the Malad area of Mumbai. After which the woman reached Malad police station. Malad police registered a case against the Yummo ice cream company and sent the ice cream for…
— ANI (@ANI) June 13, 2024
दरम्यान, मुंबईतील मालाड परिसरात एका महिलेला आईस्क्रीमच्या ( शंकू ) कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला आहे. त्यानंतर महिलेने मालाड पोलीस ठाणे गाठले. आईस्क्रीम कोनमध्ये असलेल्या मानवी बोटाचा तुकडा साधारण 2 सेमी लांब होता. मालाड पोलिसांनी युम्मो आईस्क्रीम कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून हे आईस्क्रीम तपासासाठी पाठवले आहे. आईस्क्रीममध्ये सापडलेले मानवी अवयव पोलिसांनी FSL (फॉरेन्सिक)कडे पाठवले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी संपूर्ण घटनेबाबत माहिती देतांना सांगितले,’मलाड परिसरातील एका महिलेने यम्मो कंपनीचं आईस्क्रीम ऑनलाईन मागवले होते. पण तिने ते खायला सुरुवात करताच तिच्या समोर मानवी बोटाचा तुकडा दिसला. आईस्क्रीम कोनमध्ये बोटाचा तुकडा पाहातच ती महिला ओरडू लागली आणि बेशुद्ध पडली. काहीक्षण तिच्या कुटुंबातील लोकांनाही काहीच समजलं नाही. पण त्यांना सर्व प्रकार समजल्यानंतर तात्काळ ठाणे गाठले. यानंतर या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली’





