Maharashtra : अतिवृष्टीपुढे दहावीची शुक्रवारची पुरवणी परीक्षा लांबणीवर; राज्य मंडळाचा निर्णय…

पुणे :- हवामान विभागाने राज्यात काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिल्याने इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेतील शुक्रवारी ( दि. 28 ) होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.दहावीचे पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा 3 ऑगस्टला होईल, असेही राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याशिवाय हवामान विभागाने काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
यामुळे स्थानिक परिस्थिती पाहून शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेतील वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर दहावीची 28 जुलै रोजी होणाऱ्या सामाजिक शास्त्र पेपर 1 इतिहास आणि राज्यशास्त्र विषयाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला.
दहावीची पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा 3 ऑगस्टला सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत घेण्यात येणार आहे, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.





