महाळुंगे: मायलॅब कंपनीकडून पोलिसांना कोविड तपासणी किटचे वाटप
Updated On:

महाळुंगे – पुणे जिल्ह्यात करोना आणि ओमायक्राॅनच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस 24 तास कर्तव्य बाजवत असतात. त्यांना करोनाची लक्षणे जाणवताच घरीच तपासणी करता यावी यासाठी मायलॅब कंपनीकडून महाळुंगे येथील पोलिसांना कोविड तपासणी किटचे वाटप करण्यात आले. तसेच मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार, तसेच कंपनीच्या वतीने श्रीकांत पवार, नकुल सरडे, अशोक भांगरे, सत्यम तरडे, श्रीनाथ बोरूडे उपस्थित होते.





