Mahadev Jankar : मी राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत; महादेव जानकरांनी व्यक्त केले मत
Updated On:

बुलढाणा : देशात मतचोरी होत आहे याचा मला अनुभव आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या भूमिकेशी मी सहमत असल्याचे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केले. राज्यात आणि देशात मत चोरी होत असल्याचा विरोधकांचा आरोप हा सत्य आहे.
मला स्वतःला मत चोरीचा अनुभव आला असून याबाबत निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असूनही गप्प का? असा सवाल महादेव जानकर यांनी उपस्थित केला आहे. कृषीप्रधान देशात जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसतील तर शेतकऱ्यांनी संपावर जावे असा आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
कर्जमाफीच्या मुद्यावरुन राज्यातील शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. तसेच अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने दिलेली मदत ही अपुरी असल्याचे मत व्यक्त केले आहे.





